aknath Khadse- pankaja mundhe

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं एकनाथ खडसे यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. आजच एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.

  जळगाव- आपण भाजपाचे आहोत, मात्र भाजपा (BJP) आपला पक्ष नाही, असं वक्तव्य दोन दिवसांपूर्वीच भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात जाहीरपणे केलं होतं. त्यानंतर भाजपात पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याची चर्चा पुन्हा रंगली. या चर्चेत आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही उडी घेतली आहे. पंकजा मुंडे अस्वस्थ आहेत, म्हणजे भाजपात अस्वस्थता असल्याचं खडसे म्हणाले ाहेत. भाजपात जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली आहे. एखनाथ खडसे आज पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

  काय म्हणालेत एकनाथ खडसे?

  एकनाथ खडसेंना पंकजा मुंडे यांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली असता, खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य हे वेदनादायी आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपाला रुजवण्यात मोठं योगदान दिलं. त्यांच्यासारखंच योगदान त्यांच्या दोन्ही कन्या देत आहेत. पंकजा मुंडे अस्वस्थ असणं याचाच अर्थ भाजपात अस्वस्थता आहे. ज्या बहुजन नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा महाराष्ट्रात रुजवला, त्याच जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपात छळ होतो आहे.

  आज गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी

  भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं एकनाथ खडसे यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. यात गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. आजच एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. ही भेट झाली तर राज्याच्या राजकारणात ओबीसींचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

  पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेणार का?

  देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे सातत्यानं त्यांची नाराजी व्यक्त करीत असतात. लोकसभा, विधानसभेच्या तोंडावर त्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता त्या वेगळा निर्णय घेणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी काही निर्णय होणार का, याची उत्सुकता सगळ्यांना आहे.