Heavy hailstorm in Jalgaon; Great loss to farmers

    जळगाव : कोरनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आधीच लॉकडाऊनची भिती त्यात आता नविन टेंन्शन आले आहे. चाळीसगाव तालुक्यात शनिवारी काही ठिकाणी वादळ वऱ्यांसाह गारपीट होऊन जोरदार पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले.

    चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात गारपीट विज वादळासह जोरदार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतेच शेतकऱ्यांनी शाहू, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, कापणी केली आहे सर्व माल शेतीमध्ये पडल्याने सर्व धान भिजले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा या अवकाळी पावसाने हिसकावला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

    दरम्यान, उत्तर व मध्य महाराष्ट्रासाठी 20 मार्च रोजी वादळी वाऱ्याचा इशारा भारतीय हवामान (आयएमडी) विभागाने दिला आहे. तर, २१ मार्च रोजी पुणे, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात वेगळ्या ठिकाणी वादळी वऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच २२ मार्च रोजी जळगाव, धुळे, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या गडगडासह वादळी वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे.