भाजपमध्ये कोण कोण गद्दार आहे हे मला राष्ट्रवादीत आल्यावर समजलं; एकनाथ खडसेंचा घणाघाती आरोप

मागील चार दिवसांपासून विरोधक एकनाथ खडसे(Eknathrao Khadse) यांना ईडीने अटक केली, मालमत्ता जप्त झाली अशी अफवा पसरवत आहेत परंतु मी कोणताही गुन्हा केलेला नाही सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. मागील चाळीस वर्षांपासून तुम्ही सर्व मला ओळखत आहेत. चाळीस वर्षात कोणताही भ्रष्टाचार केला नाही परंतु एका व्यक्तीच्या कट कारस्थानातुन माझ्यावर आरोप झाले आहेत अशी टीका खडसे यांनी केली.

    जळगाव : मागील चार दिवसांपासून विरोधक एकनाथ खडसे(Eknathrao Khadse) यांना ईडीने अटक केली, मालमत्ता जप्त झाली अशी अफवा पसरवत आहेत परंतु मी कोणताही गुन्हा केलेला नाही सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. मागील चाळीस वर्षांपासून तुम्ही सर्व मला ओळखत आहेत. चाळीस वर्षात कोणताही भ्रष्टाचार केला नाही परंतु एका व्यक्तीच्या कट कारस्थानातुन माझ्यावर आरोप झाले आहेत अशी टीका खडसे यांनी केली.

    मी बीएचआर पतसंस्थेचे गैरव्यवहार बाहेर काढले म्हणून माझ्या मागे ईडी लावण्यात आली बीएचआरच्या ठेवीदारांच्या ठेवी वर यांनी दरोडे घातले
    माझ्याकडे मी इन्कम टॅक्स भरतो याव्यतिरिक्त जर इतर बेहिशोबी मालमत्ता असेल तर मी ती जाहीरपणे यांना दान देऊन देईल.  काहीही करा आणि एकनाथ खडसे यांना जेलमध्ये टाका असे कारस्थान सुरू आहे परंतु मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही असे खडसे म्हणाले.

    मागील चाळीस वर्षे मी दिवसरात्र एक करून भाजपाचा विस्तार केला तरी माझ्यावर पक्ष सोडून जाण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. माझ्या सारख्या व्यक्तीवर ही वेळ आणण्यात येते तर भाजप मधील सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे काय होणार आहे? असा सवाल उपस्थित केला.

    मी संकटात असताना शरद पवार साहेब, अजित दादा पवार, जयंतराव पाटील यांनी मला भक्कम साथ दिली. मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्ताराचा शब्द दिला आहे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने मला तो खरा करून दाखवायचा आहे असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला.