‘उमेदवारी मिळाली नाही तर चित्रपटात संधी द्या’ गिरीश महाजनांची निर्मात्याकडे मागणी

तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपटच बनवावा लागेल, असे सांगत निर्मात्यानेही महाजनांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला. जामनेर येथे हलगट या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबूराव घोंगडे यांनाच थेट चित्रपटात संधी देण्यासाठी गळ घातली.

    जामनेर – भाजप नेते व देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणले जाणारे गिरीश महाजन यांनी चक्क एका निर्मात्याकडे आपल्याला भूमिका देण्याची मागणी केलीय. केवळ आपल्या एकट्यालाच नव्हे तर राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही चित्रपटात घेण्याची विनंती केलीय.

    जामनेर येथे येथील बाबुराव घोंगडे यांनी ‘हलगट’ या चित्रपटाचे पोस्टर प्रकाश कार्यक्रम झाला. यावेळी आमदार महाजन बोलत होते. पुढे बोलतांना महाजन म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया अशी गमतीने, मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी चित्रपट निर्माते यांच्याकडे केली.

    तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपटच बनवावा लागेल, असे सांगत निर्मात्यानेही महाजनांची विकेट घेतली. त्यामुळे एकच हशा पिकला. जामनेर येथे हलगट या सिनेमाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे निर्माते बाबूराव घोंगडे यांनाच थेट चित्रपटात संधी देण्यासाठी गळ घातली.

    ‘हलगट’ या चित्रपटाचे निर्माते बाबुराव घोंगडे म्हणाले, की हा चित्रपट जामनेरमध्ये निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होईल.