जळगावात लाच मागणार्याआ दोन आरटीओ एजंटांना पोलिसांनी केलं रंगेहात अटक

याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री व पडताळणी करून मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ कार्यालयात सापळा रचला. दहा हजारांची लाच घेताना शुभम चौधरी याला रंगेहाथ पकडले. तक्रारीनुसार शुभम चौधरीचा साथीदार आरटीओ एजंट राम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. शुभम राजेंद्र चौधरी (वय २३, रा. कोल्हे हिल्स, जिजाऊनगर जळगाव) व राम भीमराव पाटील (वय ३७, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ जळगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने अटक केल्याने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली होती.

    अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने बस हस्तांतरणासाठी दहा हजार रूपयांची लाच मागणाऱ्या दोन आरटीओ एजंटांनारंगेहात अटक करून गजाआड केले आहे. तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील तक्रारदाराने प्रवासी बस विकत घेतली असून ही बस त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावावर हस्तांतर करावयाची होती. याकामासाठी आरटीओ कार्यालयातील एजंट शुभम चौधरी व राम पाटील या दोघांनी तक्रारदाराला दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.

    याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री व पडताळणी करून मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ कार्यालयात सापळा रचला. दहा हजारांची लाच घेताना शुभम चौधरी याला रंगेहाथ पकडले. तक्रारीनुसार शुभम चौधरीचा साथीदार आरटीओ एजंट राम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे.

    शुभम राजेंद्र चौधरी (वय २३, रा. कोल्हे हिल्स, जिजाऊनगर जळगाव) व राम भीमराव पाटील (वय ३७, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ जळगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने अटक केल्याने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली होती.

    ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव सहायक पोलीस निरीक्षक दिनेशसिंग पाटील सुरेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुक, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ यांनी ही कारवाई केली.