जळगाव: भाजपा आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवरून सलग दुसऱ्या वर्षी भाजपा नेते गायब आहेत. बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो आहे. भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांनी बनवलेले शुभेच्छांचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सावकारे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर केवळ भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा फोटो आहे. जळगावातील राजकीय वर्तुळात मात्र बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे(Jalgaon: Photo of Eknath Khadse on BJP MLA's poster; Weave the discussion in political circles).

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभेचे भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सवरून सलग दुसऱ्या वर्षी भाजपा नेते गायब आहेत. बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा फोटो आहे. भाजपा आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे कार्यकर्त्यांनी बनवलेले शुभेच्छांचे बॅनर, फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सावकारे यांना शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर केवळ भाजपा खासदार रक्षा खडसे यांचा फोटो आहे. जळगावातील राजकीय वर्तुळात मात्र बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे(Jalgaon: Photo of Eknath Khadse on BJP MLA’s poster; Weave the discussion in political circles).

    राष्ट्रवादीच्या वाटेवर?

    आमदार सावकारे खडसे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, खडसे राष्ट्रवादी मध्ये गेल्याने सावकारे काहीसे एकाकी पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यकर्त्यांकडून देण्यात येणाऱ्या शुभेच्छांच्या बॅनरवर आता भाजपाच्या नेत्यांचे फोटो गायब झाल्याने खडसेंच्या पाठोपाठ सावकारे ही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

    दरम्यान, गेल्यावर्षीदेखील शुभेच्छांच्या बॅनरवर भाजपाच्या बड्या नेत्यांना स्थान देण्यात आले नव्हते. भाजपचे जळगावातील बडे नेते संकटमोचक गिरीश महाजन यांचा देखील फोटो बॅनरवर लावण्यात आला नव्हता. त्यावेळी देखील सावकारे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सावकारे यांनी त्यावेळी पक्षांतरचाच्या चर्चा नाकरल्या होत्या.