गुगलवर फक्त टरबूज सर्च करा… एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन(Girish Mahajan ) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचे मला कालच समजले, असा आरोप खडसे यांनी केला. खडसेंच्या या आरोपाला आता महाजन कशाप्रकारे उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे.

  जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी भाजप नेते गिरीश महाजन(Girish Mahajan ) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचे मला कालच समजले, असा आरोप खडसे यांनी केला. खडसेंच्या या आरोपाला आता महाजन कशाप्रकारे उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून जुंपली आहे.

  आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याचा हा सिलसिला सुरू असतानाच खडसे यांनी महाजन यांच्यावर नवा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. याचबरोबर त्यांनी भाजपा नेत्यांनाही राष्ट्रवादीत येण्याचे आवाहन केले आहे. भाजपवाल्यांनीच माझे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असे खडसे यांनी म्हटले आहे.

  गुगलवर टरबूज सर्च करा…

  यावेळी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. राष्ट्रवादीत आल्यानंतरच मला भाजपमधील नीच आणि गद्दार कोण हे समजले. मी चाळीस वर्ष जीवाची पर्वा न करता भाजपमध्ये काम केले. त्याच गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला. हे गद्दार कोण आहेत हे एकदा गुगलवर सर्च करून पाहा. टरबूज असे सर्च करून पाहा, मग कळेल गद्दार कोण?, अशी टीका त्यांनी फडणवीसांचे नाव न घेता केली. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. दाऊद व दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध जोडले. माझे मंत्रिपद काढून घेतले, अशी खंतही खडसेंनी पुन्हा एकदा बोलून दाखविली.

  खडसेंना महाराष्ट्रात बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. पण खडसे त्यांना भारी आहे. महाजन यांना मी आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही 10 कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत. मी यांचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला. त्यामुळेच त्यांचा जीव धकधक करत आहे. गरिबांच्या ठेवींवर यांनी दरोडे घातले. ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही, मी फक्त कोर्टाला घाबरतो.

  - एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस