नवनिर्वाचीत महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी स्वीकारला पदभार

महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या पदांचा पदभार स्वीकारण्याच्या आधी शिवसैनिकांनी परिसरात जय्यत तयारी केली. काल सायंकाळपासूनचं परिसर भगव्या रंगात रंगल्याचे दिसून आले. या भागात ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि नूतन महापौर व उपमहापौरांच्या स्वागतांचे फलक दिसून आले.

    जळगाव : नवनिर्वाचीत महापौर जयश्री  महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज पदभार स्वीकारला आहे. याप्रसंगी शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. नुकत्याच झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, महापालिकेच्या स्थापनेला १८ वर्षे पूर्ण होत असल्याचे औचीत्य साधून आज नवनिर्वाचीत महापौर आणि उपमहापौर यांनी सतराव्या मजल्यावरील कार्यालयात आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला.

    महापौर आणि उपमहापौर यांनी आपल्या पदांचा पदभार स्वीकारण्याच्या आधी शिवसैनिकांनी परिसरात जय्यत तयारी केली. काल सायंकाळपासूनचं परिसर भगव्या रंगात रंगल्याचे दिसून आले. या भागात ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि नूतन महापौर व उपमहापौरांच्या स्वागतांचे फलक दिसून आले. यानंतर सतराव्या मजल्यावर दोन्ही मान्यवरांनी आपापल्या पदांचा कार्यभार सांभाळला.

    याप्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर ललीत कोल्हे, आदींसह अन्य नगरसेवक व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.