Nilesh Rane's criticism of Gulabrao Patil in Shivral language

शिवसेना उपनेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले. या कार्यक्रमावरून भाजपा नेते नीलेश राणे यांनी पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून पातळी सोडून टीका केली(Nilesh Rane's criticism of Gulabrao Patil ). राणे यांच्या टीकेमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

    जळगाव : शिवसेना उपनेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले. या कार्यक्रमावरून भाजपा नेते नीलेश राणे यांनी पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून पातळी सोडून टीका केली(Nilesh Rane’s criticism of Gulabrao Patil ). राणे यांच्या टीकेमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.

    जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी कव्वाली गायन केले. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. यावर टीका करताना नीलेश यांनी शिवराळ भाषा वापरली. स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे, असा चिमटाही त्यांनी काढला होता.

    शिवसैनिकांत संतापाची लाट

    नीलेश राणेंच्या टीकेमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात नीलेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानुसार राणेंच्या विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, रविवारी दुपारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात जाऊन शिवसैनिकांनी नीलेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. दरम्यान, राणे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर शिवसैनिकांकडून हॅशटॅग वापरून गुलाबभाऊ समर्थक व संतप्त शिवसैनिक हा ट्रेंड सुरू झाला आहे. तसेच सोशल मीडियावरून नीलेश यांनी केलेल्या ट्विटचा निषेध देखील व्यक्त केला जात आहे.