रेमडीसीवीरचा काळाबाजार पुन्हा सुरु ; जळगाव जिल्ह्यात सर्रास चढत्या दराने विक्री

काही खासगी दवाखाने आपल्या दवाखान्यात ॲडमिट असलेल्या रुग्णांना त्यांच्या लॅबमधून अथवा त्यांच्या संबंधीत लॅबमधूनच रक्त तपासणीचा आग्रह व सक्ती करत असल्याचे दिसून आले असून त्या ठिकाणी त्यांना तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहे. त्याबाबत बिरादरीतर्फे प्रशासन व व आयएमएकडे तक्रार देण्यात आली आहे.

    जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याचा गैरफायदा काही खासगी दवाखाने, मेडिकल स्टोअर व पॅथॉलॉजी लॅबोरेटरी घेत असून मोठ्या प्रमाणात औषधी व अन्य तपासण्यांचा काळा बाजार सुरु झाला आहे. याबाबत जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व आयएमएचे सचिव डॉक्टर स्नेहल फेगडे यांच्याकडे केली आहे.

    केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी असोसिएशन १२०० रुपयांत हे इंजेक्शन देण्याचे जाहीर केल्यानंतरही अवाजवी दराने ते विकले जात असल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी २२ मार्च च्या एका परिपत्रकाच्या माध्यमातून नवीन गाईड लाईन जारी केले असून त्यानुसार ज्या रुग्णांचे मूल्यमापन सीटीस्कॅनमध्ये ८ ते १५ तीव्रतेची आढळल्यास त्या रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यात यावे व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशन करावे, अशी गाईडलाईन असल्याने जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मेडिकल स्टोअर हे रेमडीसीवरचा काळाबाजार करत आहे. केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी असोसिएशन १२०० रुपयांत हे इंजेक्शन देण्याचे जाहीर केल्यानंतरही अवाजवी दराने ते विकले जात असल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

    लॅबकडूनही लूट