जळगावातील जोडप्याला आंतरजातीय विवाह केल्याची भयानक शिक्षा! फक्त घरचेच नाही तर गावातील लोकही…

पारोळा तालुक्यातील बाभळेनाग गावात एक धक्कादायक घटना घडलीये. एका तरुण-तरुणीनं आंतरजातीय विवाह केल्यानं गावातील लोकांकडून त्यांचा छळ सुरु केला. या दोघांनी गाव सोडून जावं म्हणून तरुणाच्या कुटुंबीयांनाही अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यात येत आहे(Terrible punishment for inter-caste marriage to Jalgaon couple).

    जळगाव : पारोळा तालुक्यातील बाभळेनाग गावात एक धक्कादायक घटना घडलीये. एका तरुण-तरुणीनं आंतरजातीय विवाह केल्यानं गावातील लोकांकडून त्यांचा छळ सुरु केला. या दोघांनी गाव सोडून जावं म्हणून तरुणाच्या कुटुंबीयांनाही अश्लिल शिवीगाळ करत मारहाण करण्यात येत आहे(Terrible punishment for inter-caste marriage to Jalgaon couple).

    बाभळेनाग गावातील एका तरुण-तरुणीनं गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आंतरजातीय विवाह केला. विवाह केल्यानंतर दोघांना तरुणीच्या घरच्यांकडून विरोध व्हायला लागला. गावातील इतर लोकही त्यांचा छळ करू लागले. तरुणाच्या कुटुंबानं हा विवाह मोडून गाव सोडून जावं म्हणून दबाव टाकला जाऊ लागला. छळ असह्य झाल्यानं दोघांनी पारोळा पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी दखल घेतली नाही. शेवटी तरुणानं राज्याचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षकांकडं आपली कैफियत मांडलीय.

    दरम्यान, या घटनेतील पीडित जोडप्यानं आपली भेट घेऊन तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल आहेत. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई पण केलीये. पीडित जोडप्याला संरक्षण देण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढेंनी दिली.

    हे सुद्धा वाचा
    • 2022