प्रशासनाची चिंता वाढली; जळगाव जिल्ह्यामध्ये चोवीस तासात तब्बल १०९० कोरोनाबाधित,११रुग्णांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात चोवीस तासांमध्ये तब्बल १०९० रूग्ण आढळून आले आहेत. ही आजवरच्या एका दिवसातील रूग्णांची उच्चांकी संख्या असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. तर जळगाव शहरातील संसर्ग सर्वाधीक असल्याचेही दिसून आले आहे. प्रशासन जनता कर्फ्यू, लॉकडाऊनसह अनेक प्रयत्न करत असले तरी आता कोरोनाचा संसर्ग अतिशय भयावह पातळीवर पोहचल्याचे दिसून आले आहे.

    जळगाव : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोक वर काढलं आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे हे सरकार वारंवार सांगत आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.मात्र अजूनही कोरोनाचं संकट टळलेलं नाही. त्यामुळे राज्याचील काही भागामध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जळगाव जिल्हातही मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे.

    जळगाव जिल्ह्यात चोवीस तासांमध्ये तब्बल १०९० रूग्ण आढळून आले आहेत. ही आजवरच्या एका दिवसातील रूग्णांची उच्चांकी संख्या असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. तर जळगाव शहरातील संसर्ग सर्वाधीक असल्याचेही दिसून आले आहे. प्रशासन जनता कर्फ्यू, लॉकडाऊनसह अनेक प्रयत्न करत असले तरी आता कोरोनाचा संसर्ग अतिशय भयावह पातळीवर पोहचल्याचे दिसून आले आहे. आज सायंकाळी प्रशासनाने पाठविलेल्या रिपोर्टमधून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात चोवीस तासांमध्ये तब्बल १०९० रुग्ण आढळून आले आहेत. ही एकाच दिवसात आढळून आलेल्या रूग्णांची आजवरची सर्वाधीक संख्या आहे. आजवर एक हजाराच्या आतच रूग्ण आढळून आले असतांना आज ही मर्यादा देखील क्रॉस झालेली आहे.

    दरम्यान आजच ९०७ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याची बाब त्यातल्या त्यात दिलासा देणारी आहे. आज जळगाव शहरात सर्वाधीक म्हणजे तब्बल ४४४ पेशंट आढळून आले आहेत. शहरच्या सर्व भागांमधील हा संसर्ग असल्याचे रिपोर्टमधून दिसून आले आहे. याच्या खालोखाल भुसावळात ११९ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. आज ११ बाधिताचा मृत्यू झाला असून, उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव तालुका -३६, अमळनेर ५०, चोपडा७६, पाचोरा२६, भडगाव१४, धरणगाव६१. यावल१७, एरंडोल४०, जामनेर६९, पारोळा१७, चाळीसगाव५६, मुक्ताईनगर४२, बोदवड९ असे रूग्ण आढळून आले आहेत.