महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये सहभागी केल्याने जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे केळी उत्पादक शेतकर्यांच्या वतीने केळीच्या खोडाचे पूजन वरून व मिरवणूक काढून शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला आहे. शेतकऱ्यांच्या जल्लोषात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेत जल्लोष साजरा केला(The banana crop got fruit status in the budget; A grand procession of banana peels in Jalgaon).

गेल्या अनेक वर्षापासून केळीला पिकाचा दर्जा मिळावा यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली होती. केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे अस्मानी संकटात केळीच्या नुकसानाची भरपाई देखील अल्प प्रमाणात मिळत होती त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून केळीला फळाचा दर्जा मिळावा ही मागणी प्रलंबित होती.
मात्र, या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देवून रोजगार हमी मध्ये समाविष्ट केल्याने केळी उत्पादक शेतकरी आनंदी झाले असून या पार्श्वभूमीवर रावेर येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात केळीच्या घडा ची मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला आहे.