building collapsed in pachora jalgaon

पाचोऱ्यात पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली(Three Storey Building Collapsed in Pachora) आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातल्या पाचोऱ्यात पावसामुळे तीन मजली इमारत कोसळली(Three Storey Building Collapsed in Pachora) आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.पाचोऱ्यातल्या वल्लभभाई पटेल मार्गावर(Vallabhbhai Patel Road) ही इमारत होती. मुंबईतील(Mumbai) साजेदाबी शेख खलिल यांनी पाच वर्षांपूर्वी या इमारतीचे बांधकाम केले होते.

    मिळालेल्या माहितीनुसार कोसळलेल्या इमारतीमध्ये बांधकाम करताना काही तांत्रिक चुका झाल्या होत्या. त्यामुळे इमारतीला  तडे गेले होते. पावसाचे पाणीसुद्धा इमारतीत मुरले. त्यामुळे इमारत फुगली होती. ही वास्तू राहण्यास धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आली होती. मात्र, सोमवारी रात्रीच्या सुमारास इमारत ढासळायला सुरुवात झाली. तेव्हा बघ्यांनी गर्दी केली.  इमारत पडतानाचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.