भिडे गुरुजींच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन; ४०० जनांवर गुन्हा दाखल

    जळगाव : चोपड्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांनी जुना शिरपूर रोड वरील परिश्रम मंगल कार्यालयात संभाजी भिडे गुरुजी यांचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमात शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न झाल्याने कार्यक्रमात कार्यकर्त्यांची संख्यावर कुठलेच नियंत्रण नव्हतं ते निदर्शनात आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला चारशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असे चोपडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी सांगितले.