भाजपात आले की दुसरीकडे जाण्याची इच्छाच होत नाही; गिरीश महाजनांचा शिवसेनेला टोला

भाजपात आले की पुन्हा दुसरीकडे जाण्याची आणि इतरत्र संसार करण्याची इच्छा होत नाही, असे म्हणत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला(When it comes to BJP, there is no desire to go elsewhere; Girish Mahajan's attack on Shiv Sena).

    जळगाव : भाजपात आले की पुन्हा दुसरीकडे जाण्याची आणि इतरत्र संसार करण्याची इच्छा होत नाही, असे म्हणत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला(When it comes to BJP, there is no desire to go elsewhere; Girish Mahajan’s attack on Shiv Sena).

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन आणि खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमात महाजन बोलत होते. यावेळी त्यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.

    मलिक पत्रकार परिषदेत हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते, मात्र इतका फुसका जर हायड्रोजन बॉम्ब असेल तर त्याचे नावच बदलावे लागेल. मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप हे निव्वळ हवेत गोळीबार असून पुराव्याचा एक तरी कागद मलिक यांनी दाखवावा, असे आव्हान त्यांनी दिले. केवळ आपल्या स्वार्थासाठी नवाब मलिक निरर्थक आरोप करत असून आर्यन खान किती चांगला व हर्बल तंबाखू किती छान हे सांगण्यापेक्षा मलिक यांनी आता जनतेकडे लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत महाजन यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला.

    एकदा भाजपात आले की इतर कुठे संसार करायची इच्छाच होत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्थानिक पक्ष आहेत. शिवसेना आमच्यासोबत होती म्हणून त्यांचे 18 खासदार आणि 55 आमदार निवडून आले आहेत.

    - गिरीश महाजन, भाजपा