“ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी 1200 कोटींची संपत्ती जमवली, याची चौकशी का नाही?; एकनाथ खडसेंचा सवाल

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांचे वडील शिक्षक होत. त्यावरून एकनाथ खडसे यांनी ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती कशी जमवली?, असा सवाल करत गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे.

    जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. गिरीश महाजन यांचे वडील शिक्षक होत. त्यावरून एकनाथ खडसे यांनी ज्यांचे वडील मास्तर होते त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती कशी जमवली?, असा सवाल करत गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे.

    एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

    ‘मला ईडी लावली तर मी सीडी लावेल’, एकनाथ खडसे यांचं हे वक्तव्य चांगलचं चर्चेत होतं. त्यानंतर ईडीने एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई केली होती. आता ईडीचा काहीही संबंध राहिला नाही, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एकनाथ खडसे यांनी माझे स्वत:चे घरवाडे होते. परंतु, ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली, त्यांची चौकशी का होत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. माझे प्रकरण आता न्यायालयात गेलं आहे. त्यावर न्यायालयचं काय तो निर्णय घेईल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

    दरम्यान, माझं नाव खराब करण्यासाठी विरोधक जिवाचं रान करत आहेत. नाथाभाऊंची ताकद माहित असल्यानेच विरोधक असं कृत्य करत आहेत, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.