प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत शिरसोली राेडवरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात १०० रुग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र, दीड-दोनशे रुग्णांची क्षमता असतांना प्रशासनाने डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करुन न दिल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे

  जळगाव : काेेराेेनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने जळगाव जिल्ह्यात काेराेनाबाधितांची परवड सुरू आहे. जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील हिंगणे येथून आलेल्या एका महिलेची नवऱ्याला व मुलाची वडिलांना वाचवण्यासाठी सुरु असलेली धावपळ जिल्‍हा व स्थानिक प्रशासन संक्रमण काळात आरोग्य सुविधा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून आले आहे.

  धरणगाव तालुक्यातील हिंगणे येथील प्रल्हाद सिताराम पाटील (४८) यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी टायफाइडच्या आजारावर गावातच उपचार सुरु होते. आजारपण वाढत असल्याने कुटूंबीयांनी त्यांना जळगावी आणले मात्र शासकीय रुग्णालयांसह कुठेच बेड उपलब्ध नसल्याने एका रुग्णवाहिका चालकाने त्यांना इकरा वैद्यकीय महाविद्यालयात आणले. काेराेना चाचणी पॉझिटीव्ह असल्याने रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले. गेल्या चार दिवसांपासून ते अाॅिक्सजनवर असून, त्यांची प्रकृती खालवत असल्याने येथील डॉक्टरांनी त्यांना व्हेंटीलेटर बेड असलेल्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.

  आजारी पतीसाठी व वडिलांसाठी वाट्टेल ते, करण्याची तयारी असलेल्या ज्योती पाटील व त्यांच्या मुलाने जळगाव शहरातील सर्वच खासगी रुग्णालयालये धुंडाळले. मात्र कुठेच व्हेंटीलेटर बेड त्यांना मिळाला नाही. अखेर त्यांनी जिल्‍हा प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर मिळवून त्यांना फोन लावूनही उपयोग होत नसून हे कुटूंबीय आपल्या रुग्‍णासाठी धावपळ करत असल्याचे गंभीर चित्र आहे.

  बेड मॅनेजमेंटकडूनही नकार
  जिल्‍हा प्रशासन व शासकिय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या बेड व्यवस्थापन समिती कार्यालयातही संपर्क केला असता त्यांनीही व्हेंटीलेटर बेड उपलब्ध नसल्याचे कळवले. पाटील कुटूंबीय व्हेंटीलेटर बेडसाठी शोधाशोध बगता परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते.

  रुग्णाचा खच डॉक्टर मात्र एकच
  जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत शिरसोली राेडवरील इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात १०० रुग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. मात्र, दीड-दोनशे रुग्णांची क्षमता असतांना प्रशासनाने डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध करुन न दिल्याने येथे येणाऱ्या रुग्णांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. १०० खाटांच्या रुग्णालयासाठी केवळ १ डॉक्टर व दोन नर्सेस असा स्टाफ असल्याचे येथे कार्यरत एका डॉक्टरने रुग्ण नाकारतांना माहिती दिली आहे. प्रशासन स्टाफ देत नाही, शंभरच्या वर रुग्ण दाखल असून, एक माणूस काय काय, बघेल. खाटा खाली असल्या तरी आमच्या शरीराचीही क्षमता असल्याचा टाहाे येथील डॉक्टरने फोडला.