girish mahajan

जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या चौकशीप्रकरणी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहेत. याप्रकरणामुळे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वादातून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटावर निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा कोथरुड पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशीसाठी रविवारी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात धडकले. भोईटे कुटुंबीयांसह इतर ठिकाणी दिवसभर झाडाझडती घेतली(Will Girish Mahajan's problems increase? A thorough investigation was carried out by a team of Pune police in Jalgaon on Sunday).

  जळगाव : जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या चौकशीप्रकरणी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले आहेत. याप्रकरणामुळे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वादातून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटावर निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा कोथरुड पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशीसाठी रविवारी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात धडकले. भोईटे कुटुंबीयांसह इतर ठिकाणी दिवसभर झाडाझडती घेतली(Will Girish Mahajan’s problems increase? A thorough investigation was carried out by a team of Pune police in Jalgaon on Sunday).

  पाच संशयितांच्या घरी झाडाझडती

  झाडाझडतीदरम्यान महत्त्वाचे धागेदोरे व दस्तावेज पोलिसांकडून हस्तगत करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र पुणे आणि जळगाव पोलिसांनी तूर्त याबाबत प्रतिक्रिया देणे टाळले आहे. जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.

  हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला. त्यानुसार, चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळीच जळगावात धडकले. पोलीस उपआयुक्त सुष्मा चव्हाण यांच्या नेतृत्वात पाच पथके तयार करण्यात येऊन या पथकाकडून स्वंतत्ररित्या चौकशी करण्यात आली.

  मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्या भीतीपोटी गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली. माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, गिरीश भाऊ लवकर बरे व्हावे, त्यांची प्रकृती स्वास्थ्य चांगले राहावे, त्यांची समाजाला महाराष्ट्राला गरज आहे.

  - एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
  हे सुद्धा वाचा
  • 2022