हा बाप होता म्हणून तू निवडून आला; गुलाबराव पाटील यांची उन्मेष पाटलांवर घणाघाती टीका

उन्मेष पाटील आपली लायकी ओळखून रहा, हा बाप होता म्हणून तू निवडून आला, अशा शब्दांमध्ये जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

    जळगाव : उन्मेष पाटील आपली लायकी ओळखून रहा, हा बाप होता म्हणून तू निवडून आला, अशा शब्दांमध्ये जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

    कालच्या जळगावातील भाजपच्या महाआक्रोश मोर्चात खासदार उन्मेष पाटील यांनी पालकमंत्र्यांवर शेलक्या भाषेत टीका केली होती. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथील कार्यक्रमात यावर जोरदार पलटवार करत खासदार उन्मेष पाटलांनी केलेल्या टिकेची परतफेड केली. त्यानी भाजपावरही जोरदार टीका केली.