नंदुरबारमधील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा, रुग्णांवर उपचार सुरु

नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर या सर्वांनी तपासणीसाठी डॉक्टरांना दाखविले असता, त्यांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 125 पैकी काहींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. मात्र अद्यापही 40 जणांवर रकासवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

    नंदूरबार : काल (मंगळवारी) राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. राज्यातील विविध भागात महाशिवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम करण्यात आले. तसेच महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते, पण महाशिवरात्रीच्या महाप्रसादातून भाविकांना विषबाधा झाल्याचे नंदुरबारमध्ये उघडकीस आले आहे.

    दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीच्या प्रसादातून 125 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. दुपारी प्रसाद खाल्ल्यानंतर सायंकाळी उलटी आणि मळमलिचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर या सर्वांनी तपासणीसाठी डॉक्टरांना दाखविले असता, त्यांना महाप्रसादातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 125 पैकी काहींना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. मात्र अद्यापही 40 जणांवर रकासवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

    या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, विषबाधा झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदारांसह आरोग्य प्रशासन तळ ठोकून आहे, तसेच विषबाधा झालेल्या भाविकांची अजून संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळं महाप्रसादाचा लाभ घेतलेल्यामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.