Danger accident in Nandurbar; The cruiser crashed into a ravine, killing eight people

सिंदीदिगर घाट हा तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग आहे.सायंकाळीच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेवून जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चुराडा झाला आहे. या गाडीत असलेल्यांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या गाडीत 30 जण प्रवास करत होते. जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झालेत.

    नंदुरबार : नंदुरबारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. तोरणमाळ सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतुक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळली आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यु झाला आहे.

    सिंदीदिगर घाट हा तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग आहे.सायंकाळीच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेवून जात होती. त्यावेळी हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पूर्ण चुराडा झाला आहे. या गाडीत असलेल्यांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या गाडीत 30 जण प्रवास करत होते. जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झालेत.

    जखमी प्रवाशांची संख्या लक्षात घेता मृतांची आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. अतिश दुगर्म भाग असल्याने अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यास विलंब झाला.

    जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात येत आहे. जिल्हा मुख्यालयातुन पोलिस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.