माय-लेक आणि बाप-लेक; भीषण अपघातात पाच जण जागीच ठार

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर सलसाडी फाट्याजवळ सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली एकमेकांना जोरदार धडकल्या गेल्याने ही घटना घडली. मुलाचे आधार अपडेट करण्यासाठी तुळाजा येथील कुटुंब तळोजा येथे आले होते. ते काम संपवून पुन्हा तुळाजाकडे जात असताना हा अपघात घडला.

    नंदुरबार : तळोदा तालुक्यातील तळवे मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये तब्बल 5 जणांचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातामध्ये तुळाजा येथील 3 आणि तळोदा येथील 2 मृतांचा समावेश असून त्यामध्ये एका गाडीवरील माय-लेकाचा तर दुसऱ्या गाडीवरील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे.

    तळोदा तालुक्यातील आमलाड ते बोरद रस्त्यावर सलसाडी फाट्याजवळ सुमारास समोरासमोरून येणाऱ्या दोन मोटरसायकली एकमेकांना जोरदार धडकल्या गेल्याने ही घटना घडली. मुलाचे आधार अपडेट करण्यासाठी तुळाजा येथील कुटुंब तळोजा येथे आले होते. ते काम संपवून पुन्हा तुळाजाकडे जात असताना हा अपघात घडला.

    या अपघातात दारासिंग छगन जाभोरे (48), मदन दिवळ्या नाईक (50), अमित मदन नाईक(10) हे जागीच ठार झाले, तर बोरद येथून शेतीचे कामे पूर्ण करुन दुचाकीने आई आणि पत्नी सोबत तळोदा येथे परतत असणाऱ्या उमेश शांतीलाल चव्हाण व सोबत असलेली त्याची आई सुंनंदा चव्हाण यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पूजा उमेश चव्हाण गंभीर जखमी आहे.