मिरवणुकीला परवानगी नाकारल्याने गुलाल व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

गुलाल व्यावसायिक वर्षाला 12 ते 15 हजार बॅग विकत होता. एक गुलालची बॅग 120 रु विकली जाते; परंतु आता शासनाने मिरवणुकीला परवानगी न दिल्यामुळे कोणीही गुलाल घेण्यासाठी येताना दिसत नाही.

    नंदुरबार (Nandurbar) : महाराष्ट्र शासनाने (the Government of Maharashtra) गणपती विसर्जन मिरवणुकी (Ganpati Immersion Procession) संदर्भात नियमावली आखून दिल्यामुळे यावर्षीही कुठल्याही प्रकारची मिरवणूक न निघता अत्यंत साध्या पद्धतीने गणपती विसर्जन (Ganpati Immersion) होणार आहे त्यामुळे याचा फटका कळत, नकळत गुलाल व्यावसायिकांना बसला आहे.

    कोरोनाच्या आधी दोन वर्षापूर्वी जवळपास जिल्हाभरातून गुलाल चा व्यवसाय हा 50 ते 55 लाखाच्या आसपास होता परंतु कोरोनामुळे शासनाने नियमावली लावली. त्यामुळे हा व्यवसाय आता एक ते दोन लाखाच्या आसपास येऊन ठेपला आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात जवळपास पंचवीस ते तीस गुलाल व्यवसायिक आहेत. प्रत्येक गुलाल व्यावसायिक वर्षाला 12 ते 15 हजार बॅग विकत होता. एक गुलालची बॅग 120 रु विकली जाते; परंतु आता शासनाने मिरवणुकीला परवानगी न दिल्यामुळे कोणीही गुलाल घेण्यासाठी येताना दिसत नाही . गुलाल व्यावसायिकांच्या जिथे वर्षाला हजारो बॅगा विकल्या जात होत्या.

    तिथे आता फक्त बोटावर मोजण्याएवढेच बॅगा विकल्या जात आहे ,त्यामुळे कळत नकळत कोरोनाचा फटका हा गुलाल व्यवसायिकांना देखील बसला आहे. जिथे वर्षाला 50 ते 55 लाखाच्या आसपास उलाढाल होत होती ती आता गेल्या वर्षापासून लाख दोन लाखावर येऊन ठेपली आहे त्यामुळे गुलाल व्यवसायीक ही अडचणीत सापडले आहेत.