राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १७ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांपैकी फक्त ०३ जागांवर विजय मिळवता आला आहे. धडगाव नगरपंचायत मधील निकालाचे चित्र पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धडगाव नगर पंचायत मध्ये मंत्री के.सी.पाडवी यांना मोठा झटका बसला आहे.
नंदूरबार : धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बुद्रुक नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांचे निकाल जाहीर झाले असून शिवसेनेने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवून नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा मतदारसंघ असलेल्या धडगाव नगरपंचायतमध्ये काँग्रेसला फक्त ०३ जागा मिळाल्या आहे. विशेष म्हणजे भाजपाने आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच धडगाव नगरपंचायतीमध्ये उमेदवार रिंगणात उभे केले होते. भाजपला ०१ जागेवर समाधान मानावे लागले आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १७ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांपैकी फक्त ०३ जागांवर विजय मिळवता आला आहे. धडगाव नगरपंचायत मधील निकालाचे चित्र पाहता काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धडगाव नगर पंचायत मध्ये मंत्री के.सी.पाडवी यांना मोठा झटका बसला आहे.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सभापती गणेश पराडके व जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके यांनी शिवसेनेसाठी कंबर कसली होती. अखेर शिवसेनेने विजयश्री खेचून आलात धडगाव नगरपंचायती वर भगवा फडकवला आहे.