चांदसैली घाटात दरड काेसळली; वाहतूक काेंडीने घेतला महिलेचा जीव

तळोदा (वा) तळोदा धडगांव रस्त्यावरील चांदसैली घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. या वाहतूक काेंडीमुळे एका महिलेला उपचारासाठी खांद्यावर बसवून घेऊन जात असतानाच तिने प्राण साेडला.

    नंदूरबार : तळोदा (वा) तळोदा धडगांव रस्त्यावरील चांदसैली घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली. या वाहतूक काेंडीमुळे एका महिलेला उपचारासाठी खांद्यावर बसवून घेऊन जात असतानाच तिने प्राण साेडला. त्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त हाेत असून, या महिलेच्या बळीला जबाबदार काेेण? असा सवाल उपस्थित हाेत आहे.

    जिल्हयात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु होता. या पावसामुळे तळोदा-धडगांव रस्त्यावरील चांदसैली घाटात महिनाभरात दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना घडली. दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. सिदलीबाई पाडवी या महिलेच्या पोटात दुखत असल्याने पहाटे दवाखान्यात घेऊन जात असताना रस्ता नसल्याने तिला खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ नातेवाईकांवर आली. तिने घाटातच जीव साेडला. त्यामुळे दुर्गम भागातील दळवळणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    पालकमंत्री के. सी. पाडवी हे या भागातचे प्रतिनिधित्व करतात. याच मतदारसंघातील धडगांव तालुक्यात असलेली चांदसैली घाटात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची केंद्रीय मानवाधिकार आयोगाने या दखल घेतली असून, जिल्हा प्रशासनाकडे चाैकशीचा अहवाल मागितला आहे.