नंदुरबार जिल्हा कोरोनमुक्त; बाधितांची संख्या शून्यावर

नवीन कोरोनाबाधिताचीही संख्या शून्यावर आहे, त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनमुक्त झाला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे

    नंदुरबार, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव ओसरत चाललेला असताना आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातल्या नंदुरबार जिल्हात (Nandurbar District )सहाही तालुक्यात एकही सक्रिय कोरोनाबाधित नाही(corona Free).

    याशिवाय नवीन कोरोनाबाधिताचीही संख्या शून्यावर आहे, त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनमुक्त झाला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्या डिड दोन वर्षांपासून गोठलेले जनजीवन सुरळीत होत असून सरकनेही निर्बंध शिथिल केले आहे.