वाघाच्या मिशिला हात लावून दाखवा! संजय राऊत यांचे चंद्रकांत पाटलांना थेट आव्हान

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेची पिंजऱ्यातला वाघ अशी संभावना केल्यानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक टीका-टिप्पणी सुरूच आहे. यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत पाटलांना थेट आव्हान दिले आहे. पाटील यांना फार गांभिर्याने घेऊ नका, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना पिंजऱ्यातला वाघ असेलही, पण वाघ हा वाघच असतो आम्ही पिंजऱ्याची दार उघडी ठेवली आहे. हिंमत असेल तर त्यांनी पिंजऱ्याच्या आत येऊन वाघाच्या मिशिला हात लावून दाखवावा, असे राऊत यांनी म्हटले आहे.

    नंदूरबार : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेची पिंजऱ्यातला वाघ अशी संभावना केल्यानंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक टीका-टिप्पणी सुरूच आहे. यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत पाटलांना थेट आव्हान दिले आहे. पाटील यांना फार गांभिर्याने घेऊ नका, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शिवसेना पिंजऱ्यातला वाघ असेलही, पण वाघ हा वाघच असतो आम्ही पिंजऱ्याची दार उघडी ठेवली आहे. हिंमत असेल तर त्यांनी पिंजऱ्याच्या आत येऊन वाघाच्या मिशिला हात लावून दाखवावा, असे राऊत यांनी म्हटले आहे.

    …मग, पिंजऱ्यात येऊन दाखवा

    चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी शिवसेनेला पिंजऱ्यातला वाघ असे म्हटले होते. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, गुरुवारी चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस होता. त्यांनी केक जास्त खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका. ते पिंजऱ्यातला वाघ म्हणतात. पण, वाघ हा शेवटी वाघच असतो. पिंजऱ्यातला असो की बाहेर. वाघाला पिंजऱ्यात का ठेवले जाते? उघडले की तुमच्यावर हल्ला करणारच ना, ठीक आहे पिंजऱ्याचा दार तुमच्यासाठी उघडा ठेवतो. या आतमध्ये, येऊनच दाखवा, असे राऊत म्हणाले.

     काँग्रेस हा देशातला प्रमुख विरोधी पक्ष

    काँग्रेस हा देशातला प्रमुख विरोधी पक्ष असून त्यांचे अनेक तरुण नेते पक्ष सोडून जात आहे. त्यांनी संघटना मजबूत केली पाहिजे कारण विरोधी पक्ष हा लोकशाहीसाठी अधिक मजबूत हवा हे आपण काँग्रेसबाबत म्हटले असल्याचे संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

    पंतप्रधान व मुख्‍यमंत्री भेटीचे राजकारण नको

    मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यात मुख्‍यमंत्र्यांनी महाराष्‍ट्रातील काही प्रलंबित असलेल्‍या मुद्यांवर पंतप्रधानांसोबत चर्चा केली. मात्र त्‍यांच्‍या या भेटीची वेगळीच चर्चा केली जात असून, शिवसेना भाजपसोबत येण्याबाबत काहींच्‍या अपेक्षा वाढल्‍या आहेत. मात्र पंतप्रधान व मुख्‍यमंत्रींच्‍या भेटीचे राजकारण करण्याची गरज नसल्‍याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी स्‍पष्‍ट केले.

    हे सुद्धा वाचा