The madness of love fell heavily; The big blisters came in the hands of the girlfriend

सदर गुन्हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी विनयकुमार रामजनम राय वय 38 जिल्हा सीवन बिहार याचे मयत तरुणी सीताकुमारी समद कुमार भगत वय 24 जिल्हा छपरा बिहार तिच्याशी गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होते. ती बिहार हुन आरोपीस भेटण्यासाठी आली होती .मयत तरुणीने आरोपी सोबत लग्नाच्या हट्ट केला .यातून दोघा मध्ये वाद झाला व यातून खून झाल्याचे निष्पन्न झाले.

    नंदुरबार तालुक्यातील 10 दिवसावर घडलेल्या क्लिष्ट अश्या खुनाच्या गुन्ह्याच्या तपास लावतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. तब्बल 22 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करत पोलीस पथक हे आरोपी पर्यंत पोहोचले आहे. नंदुरबार तालुक्यातील बिलाडी शिवारात 10 दिवसापूर्वी एका 23 ते 24 वर्षे वयोगटातील महिलेच्या मृतदेह आढळून आला होता कोणत्याही प्रकारच्या पुरावा अथवा मृतदेहाची ओळख नव्हती ,घटनास्थळी महिलेचे डोके धडापासून वेगळे होते. ही घटना सुन्न करणारी होती.

    परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करण्यास सुरुवात केली व 10 दिवसात सदर प्रकरणाचा छडा लावला. सदर गुन्हा प्रेम प्रकरणातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी विनयकुमार रामजनम राय वय 38 जिल्हा सीवन बिहार याचे मयत तरुणी सीताकुमारी समद कुमार भगत वय 24 जिल्हा छपरा बिहार तिच्याशी गेल्या दोन वर्षापासून प्रेम संबंध होते. ती बिहार हुन आरोपीस भेटण्यासाठी आली होती .मयत तरुणीने आरोपी सोबत लग्नाच्या हट्ट केला .यातून दोघा मध्ये वाद झाला व यातून खून झाल्याचे निष्पन्न झाले.

    सदर गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पोलीस पथकाने 21 रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासले .त्यातून हा आरोपी गुजरात राज्यातील सुरत येथे आढळून आला. सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार याच्या मार्गदर्शना खाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व यांच्या पथकाने केली आहे.