मुलीचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळला; ना सुगावा ना पुरावा, तरीही लावला हत्येचा छडा

सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या कपड्याच्या वर्णनाशी जुळून आले. त्यासाठी पोलिसांच्या एक टीमने सुरतला जाऊन तपासणी केली असता, हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे हाती लागले.

  नंदुरबार (Nandurbar) : परिसरातील बिलाडी शिवारात (Biladi Shivar) रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात (unraveling the mystery) पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV footage) आधाराने हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरात (Gujarat) राज्यातून अटक करण्यात आली आहे. एका अनोळखी महिलेचा (unidentified woman) मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र लग्नाचा तगादा लावल्यानेच तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

  सीसीटीव्हीमध्ये प्रेमी युगुल कैद
  कुठलाही पुरावा नसल्याने अनोळखी मृतदेहाचा तपास लावण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मात्र पोलिसांनी पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळ राहणारे कल्पेशभाई पटेल यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराची तपासणी केली. त्यावेळी एक तरुण आणि एक तरुणी सुरतच्या दिशेने येऊन नंदुरबारच्या दिशेने जाताना दिसली होती.

  सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेल्या तरुणीच्या अंगावर असलेले कपडे हे मृतदेहाच्या अंगावर आढळलेल्या कपड्याच्या वर्णनाशी जुळून आले. त्यासाठी पोलिसांच्या एक टीमने सुरतला जाऊन तपासणी केली असता, हत्या प्रकरणाचे सर्व धागेदोरे हाती लागले.

  लग्नाचा तगादा लावल्याने हत्या
  आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली. आमचं फोनवरून प्रेम झालं होतं; मात्र ती वारंवार लग्नासाठी मागे लागत असल्यामुळे त्याच रागातून हत्या झाल्याचा दावा आरोपीने केला. मुलगी बिहारच्या छपरा येथील, तर आरोपी तरुण सिवनचा आहे.