पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्या; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील

शेतकरी, शेतमजूर कामगार यांच्या शोषणावर जिवंत असलेली भारतीय लोकशाही जगात स सर्वोत्तम कशी आहे. हा प्रश्न आज देशतील प्रत्येक शेतकरी , कामगार , सामान्य जनता भारत बंदच्या माध्यमातून आपणास विचारत आहे . २८० दिवसांपासून आम्ही न मागितलेले कृषी कायदे तूम्ही व तूमच्या सहकाऱ्यांनी लादले. ते तूम्ही परत घ्यावे.

    नंदुरबार (Nandurbar). प्रहार शेतकरी संघटनेतर्फे (Prahar Shetkari Sanghatana) आज शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. शेतकरी कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात येत होती; परंतु पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप करून आंदोलन करताना थांबवले. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

    शेतकरी, शेतमजूर कामगार यांच्या शोषणावर जिवंत असलेली भारतीय लोकशाही जगात स सर्वोत्तम कशी आहे. हा प्रश्न आज देशतील प्रत्येक शेतकरी , कामगार , सामान्य जनता भारत बंदच्या माध्यमातून आपणास विचारत आहे . २८० दिवसांपासून आम्ही न मागितलेले कृषी कायदे तूम्ही व तूमच्या सहकाऱ्यांनी लादले. ते तूम्ही परत घ्यावे. शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती , दिडपट हमी भावाचे दिलेले वचन तुम्ही पाळले नाही. तसेच २०१४ ला आपण मोठे स्वप्न जनतेतील प्रतेक सामान्य माणसा पासून विद्यार्थी , बेरोजगार , शेतकरी यांना दाखवले ते तर पूर्ण झालेच नाही . त्याच्या ऊलट बेरोजगारी , शेतकरी आत्महत्या , गॅस , पेट्रोल , डीझेल व इतर जीवनाश्यक वस्तुंचे भाव आज गगनाला भिडले आहेत . या विरोधात आम्ही सर्व भारत बंदमध्ये सामील होत आहोत .

    २०१४ च्या आपण दिलेल्या आपल्या वचन नाम्यावर आपण चिंतन करुन पेट्रोल , डिझेल , गॅस दरवाढ मागे घ्यावी. कामगार विरोधी कायदे , नवीन आणत असलेले विज विधेयक मागे घ्यावे , महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत मजुरांचे दिवस व मजूरीत वाढ करावी. अन्यथा केंद्र सरकारला गंभीर परीणाम भोगावे लागतील असे प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपिन पाटील यांनी सांगितले . यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.