मोदी हे देशाला लागलेले एक ‘व्हाईट फंगल’   पाहा कोण म्हणाले असे?

केंद्रातील भाजपा सरकार हे हिंदु विरोधी सरकार आहे .गंगा नदीत जे मृतदेह वाहून जात होते ते काय हिंदूंचे नव्हते का असा प्रश्न करत यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला

    नंदुरबार: महाराष्ट्र काँग्रेस कमिटी व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने व्यर्थ न हो बलिदान या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Women and Child Development Minister Yashomati Thakur) होत्या  तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास मंत्री ऍड के सी पाडवी , महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायकराव देशमुख माजी मंत्री पद्माकर वळवी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई वळवी उपस्थित होते .या निमित्ताने हुतात्मा शिरीषकुमार स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते वीरचक्र अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या वारसांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला.

    यावेळी राज्याच्या महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांची केंद्रावर सडकून टिका केली व सांगितले की या बाल हुतात्मानी देशासाठी बलिदान दिले आहे व तुम्ही काय करत आहात आज देशात जे चालले आहे त्या विरोधात तुम्ही पेटूल उठायला पाहिजे .जसे चहा मध्ये बिस्कीट डुबुन जाते तसे आज केंद्र सरकार मुळे देश डुबत जात आहे .केंद्रातील
    भाजपा सरकार हे हिंदु विरोधी सरकार आहे .गंगा नदीत जे मृतदेह वाहून जात होते ते काय हिंदूंचे नव्हते का असा प्रश्न करत यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकार वर निशाणा साधला.  भगवा हि कोणा एका पक्षाची जहागीर नाही .मोदी हे देशाला लागलेले एक व्हाईट फंगल आहे असे यशोमती ठाकूर यांनी कॉग्रेस पक्ष आयोजीत व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन केंद्रावरती निशाना साधला.