आता गोदाकाठी ऐकू येणार महाआरतीचे सूर! सांस्कृतीक विभागाचा पुढाकार

या महापूजेसाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी दिला जाणार आहे. यासाठी ११ पुजाऱ्यांची नेमणूकदेखील केली जाणार आहे.

    नाशिक : अयोध्या, (Ayodhya) वाराणसी (Varanasi) आणि हरिद्वारला (Haridwar) गंगा नदीची महाआरती करण्यात येते. पर्यटनाच्या दृष्टीने या उपक्रमाला देखील महत्व आहे. या धर्तीवर आता नाशिकच्या (Nashik) गोदावरी नदीची (Godawari River) देखील रोज महाआरती (MahaArati) होणार आहे. सांस्कृतीक विभागाने हा निर्णय घेतला असून यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

    नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे मोठं पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक इथं भेट देतात. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे कुंभमेळा देखील भरत असतो आणि याठिकाणी देशभरातील भाविक येत असतात. येथील गोदावरी नदीलाही अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे अयोध्या वाराणसी प्रमाणे नाशिकमध्येही गोदावरी नदीची महाआरती करण्यात यावी. अशी मागणी करण्यात येत होती. पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून अखेर गोदावरी नदीवर महाआरतीसाठी सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. रोज संध्याकाळी ही महाआरती होईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. या महापूजेसाठी सरकारकडून पाच कोटींचा निधी दिला जाणार आहे. यासाठी ११ पुजाऱ्यांची नेमणूकदेखील केली जाणार आहे.