In Navi Mumbai, the employees of the Municipal Corporation forged a certificate of vaccination for Rs. Police raid Masala Market

आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना लसीकरण संदर्भातील सर्व्हे दरम्यान एकाकडे एकच बॅच नंबर असलेले प्रमाणपत्र आढळून आल्याने धुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लस न घेताच प्रमाणपत्र अदा केल्याचा प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त होतो आहे.

    मालेगाव : शहरातील एका लसीकरण लाभार्थीकडे एकाच बॅच नंबरचे लसीकरण प्रमाणपत्र आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. धुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर या लाभार्थ्याने लस घेतली होती. त्यामुळे लस न घेताच ऑनलाइन नोंदणी करून लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रकार घडला असल्याचा संशय बळावला आहे.

    कारवाईची शक्यता
    आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना लसीकरण संदर्भातील सर्व्हे दरम्यान एकाकडे एकच बॅच नंबर असलेले प्रमाणपत्र आढळून आल्याने धुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लस न घेताच प्रमाणपत्र अदा केल्याचा प्रकार घडत असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच मालेगाव महापालिकेच्या आरोग्य अधिका-यांनी धुळे महापालिका आरोग्य अधिका-यांची पत्रव्यवहार करीत प्रकार निदर्शनास आणून दिला असून तेथील आरोग्य केंद्रांवर बनावट काम होत असल्यास कारवाई करण्याबाबत सूचित केले.

    अनेकांनी धुळ्यात लस घेतली!
    यासंदर्भात धुळे महापालिकेकडून अद्याप कोणताही खुलासा मालेगाव महापालिकेला प्राप्त झाला नसल्याने लसीकरण न करता बोगस प्रमाणपत्र मिळवले जात असल्याचा प्रकार हा धुळे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर घडत नाही ना? असा प्रश्न कायम आहे. महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जावून ‘लसीकरण केले आहे का?’ याविषयी सर्वेक्षण करीत असून शहरात अनेक जण ‘धुळे महापालिका येथे लस घेतली’ असे सांगतात. कर्मचा-यांकडून लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र तपासले जात असून त्यातून हा प्रकार उघड झाला आहे. एका लाभार्थीचे लसीकरण प्रमाणपत्र तपासले असता त्यात ४१२१एमसी०९५ असा एकच बॅच नंबर प्रमाणपत्रावर आढळून आला. लसीच्या दोन्ही मात्रांमध्ये ९० दिवसांचे अंतर असतांना एकच बॅच नंबर येऊ शकत नसल्याने हा बनावट प्रकार उघड झाला आहे.