नाशिक : लॉकडाउनमध्ये दुकान सुरू ठेवणाऱ्या साडी दुकान मालकाला दंडाची पावती देताना मनपा अधिकारी भुषण देशमुख,राजेश सोनवणे,प्रकाश उखाडे, सचिन गवळी,राहुल बोटे आदी.
नाशिक : लॉकडाउनमध्ये दुकान सुरू ठेवणाऱ्या साडी दुकान मालकाला दंडाची पावती देताना मनपा अधिकारी भुषण देशमुख,राजेश सोनवणे,प्रकाश उखाडे, सचिन गवळी,राहुल बोटे आदी.

विशेषतः दुकानांमध्ये गर्दी होऊन शासकीय नियमांचे उल्लंघन होऊन कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असते. त्यामुळे शनिवार व रविवार सुटीच्या दिवशीही मनपा पथकाला पंचवटी परिसरात कारवाई करावी लागत आहे. या पथकाने शनिवारी (दि.२७) पंचवटीतील हॉटेल जत्रा परिसरात रोहिणी साडी, बालाजी साडी आणि अंबिका साडी या दुकानांवर कारवाई करत प्रत्येकी पाच हजार रूपये दंडात्मक कारवाई केली.

    पंचवटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार आणि रविवार जीवनावश्यक वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश सतानाही दुकाने सुरू ठेवल्याने मनपाच्या पथकाने पंचवटीतील तीन साडी दुकानांवर तसेच विना मास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.

    कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असतांना प्रशासनाने नियम कठोर केले आहेत.कोरोना आजाराचा प्रादृर्भावा रोखण्यासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहिर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने दररोज सायंकाळी सात वाजेच्या आत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दर शनिवार व रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व प्रकारचे दुकाने दिवसभरात पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश आहेत.तरीही लाॅकडाऊन दरम्यान काही दुकाने चालू असल्याचे दिसून येत असल्याने मनपा व पोलीस पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

    विशेषतः दुकानांमध्ये गर्दी होऊन शासकीय नियमांचे उल्लंघन होऊन कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती असते. त्यामुळे शनिवार व रविवार सुटीच्या दिवशीही मनपा पथकाला पंचवटी परिसरात कारवाई करावी लागत आहे. या पथकाने शनिवारी (दि.२७) पंचवटीतील हॉटेल जत्रा परिसरात रोहिणी साडी, बालाजी साडी आणि अंबिका साडी या दुकानांवर कारवाई करत प्रत्येकी पाच हजार रूपये दंडात्मक कारवाई केली. यावेळी एकूण १५ हजार रुपये दंड वसूल केला असून विना मास्क दहा नागरिकांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. असे एकूण सतरा हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विभागीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक भूषण देशमुख,राजेंद्र सोनवणे,प्रकाश उखाडे,राहुल बोटे,सचिन गवळी, दिपक मिंधे यांच्या पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.