
आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांनी दिलेली माहिती की संशयित तजेंद्र सिंह (३२, रा. उज्वलनगर, मुसळगाव एमआयडीसी) याचे मुसळगाव येथे गुरूकृपा मोबाईल शॉप आणि इलेक्ट्रिकल दुकान आहे. तो अवैध तिकीट विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक रविंद्र कुमार, सागर वर्मा यांनी सिन्नर पोलिसांच्या मदतीने तजेंद्र सिंहकडे चौकशी केली.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) सिन्नर पोलिसांच्या मदतीने सिन्नरमधील ट्रॅव्हल्सचा संचालक व एजंटला रेल्वे तिकीट काळा बाजार प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांना अटक करून संगणक, तिकीटे व अन्य साहित्य जप्त केले. मनमाड कोर्टात सादर करण्यात आले. कोर्टाने त्यांची जामीनावर मुक्तता केली.
आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांनी दिलेली माहिती की संशयित तजेंद्र सिंह (३२, रा. उज्वलनगर, मुसळगाव एमआयडीसी) याचे मुसळगाव येथे गुरूकृपा मोबाईल शॉप आणि इलेक्ट्रिकल दुकान आहे. तो अवैध तिकीट विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक रविंद्र कुमार, सागर वर्मा यांनी सिन्नर पोलिसांच्या मदतीने तजेंद्र सिंहकडे चौकशी केली. त्याचा मोबाईल तपासला असता रेल्वेची तीन तिकीटे मिळाली. त्याने सांगितले की, आपण गरजू प्रवाशांकडून प्रत्येकी अडीचशे रुपये जास्त घेऊन सिन्नरमधील विजय ट्रॅव्हलचा मालक विजय डांगरे याच्यातर्फे तिकीट बुक करतो. रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांनी तजेंद्र सिंहकडून एक मोबाइल, पीडीएफ तिकिट जप्त केले. विजय ट्रॅव्हल्समध्ये जाऊन चौकशी केली असता डांगरेने हे आयडी आपले जुने असल्याचे सांगितले. डांगरेचा संगणक तपासला असता बारा खासगी आयडी आणि ९८३६रुपयांची तिकीटे तसेच १८ हजार ५५० रुपये किमतीचे ११ वापरलेली तिकीटे मिळाली. त्याचा संगणक, सीपीयू, वही आदी पोलिसांनी जप्त केले. दोघांना नाशिकरोड रेल्वे स्थानकात आणून रेल्वे कायद्यातील कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मनमाड कोर्टात सादर केले असता दोघांना जामीनावर मुक्तता करण्यात आली. प्रवाशांनी अधिकृत केंद्रातूनच तिकीटे घ्यावीत, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक गुहिलोत यांनी केले आहे.