साहित्य संमेलनात जल्लोष, जोश आणि उत्साहाचे वातावरण

या ग्रंथदिंडीत (Granthdindi) पोलिसांचा फौजफाटा तसेच सुरक्षा ही तैनात करण्यात आली आहे. या ग्रंथदिंडीत विविध खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मुलामुलींनी मल्लखांबाच्या उत्तम कसरती करून दाखवल्या, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ग्रंथदिंडीत महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन (Darshan of Maharashtra's Culture and Traditions) पाहायला मिळाले.

    कुसुमाग्रजनगरी, नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (94th Marathi Sahitya Sammelan, Nashik) आजपासून सुरुवात होत आहे, या पार्श्वभूमीवर सकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ते संमेलन स्थळी ग्रंथ दिंडीला (Granthdindi) सुरुवात झाली आहे.

    दरम्यान या ग्रंथदिंडीत (Granthdindi) पोलिसांचा फौजफाटा तसेच सुरक्षा ही तैनात करण्यात आली आहे. या ग्रंथदिंडीत विविध खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मुलामुलींनी मल्लखांबाच्या उत्तम कसरती करून दाखवल्या, तेव्हा उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ग्रंथदिंडीत महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन (Darshan of Maharashtra’s Culture and Traditions) पाहायला मिळाले. विठ्ठल नामाचा गजर, महिलांची फुगडी, वासुदेव हे सगळेच लक्षवेधी आणि आकर्षक होते. तसेच कुसुमाग्रज नागरी संमेलन स्थळी सुद्धा मोठी जय्यत तयारी दिसून येत आहे.

    साहित्यरसिक आणि साहित्यप्रेमी यांचा जोश, जल्लोष आणि उत्साहात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. फूड स्टॉल आणि बुक स्टॉल स्टॉल हे साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर तपासणी करून आत सोडण्यात येत आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत आले की, मोठ्या रांगोळ्या, हिरवळ, पुस्तकांचे स्टॉल हे सर्वच मन प्रसन्न करणारे वातावरण आहे. मुख्य दारातून आत प्रवेश केल्यानंतर आत मधील वातावरण हे अत्यंत प्रफुल्लित आहे. त्यामुळे ग्रंथ दिंडी केव्हा येते याची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत. जोश, जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण सध्या कुसुमाग्रजनगरी येथे पाहायला मिळते.