कामावर न पाठवल्याने राग ; पैशासाठी ऊसतोड मजुरांच्या मुलाचे उपहरण

किसन पवार व त्यांच्या टोळीने मागील वर्षी रघुनाथ चौगुले रा. खुपा गाव, ता. माजलगाव जि. बिड व अचित जाधव रा. वडरवाडी, ता. परतूर, जि. जालना यांच्याकडून मजुरीच्या बदल्यात उचल पैसे घेतले होते. मात्र जादा मजुरी मिळत असल्याने ऊसतोड मजूर हे दुसरीकडे कामाला गेल्याचे समजल्याने चौगूले व जाधव यांनी मजुरास आमचे एक लाख रुपये परत करा, असे भ्रमणध्वनीवरून सांगितल्यानंतर तुमचे पैसे दोन, तीन महिन्यांनी परत करतो असे ऊसतोड मजुराने सांगितले.

    वरणगाव : साखर कारखान्यासाठी ऊसतोड कामगाराने मुकादमाकडून उचल पैसे घेतले कामावर न जाता व पैसे परत न केल्याने ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. वरणगाव पोलिसांत याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    पैशांची मागणी
    पोलिसांनी दिलेल्या मािहतीनुसार लोणी ता. रिसोड, जि. वाशिम येथील रहिवासी असलेले किसन नागो पवार हे त्यांच्या परिवारासह ऊसतोडणीचे काम करतात. ते टोळीसह हल्ली यावल तालुक्यातील वडरी येथे वास्तव्यास अाहेत. किसन पवार व त्यांच्या टोळीने मागील वर्षी रघुनाथ चौगुले रा. खुपा गाव, ता. माजलगाव जि. बिड व अचित जाधव रा. वडरवाडी, ता. परतूर, जि. जालना यांच्याकडून मजुरीच्या बदल्यात उचल पैसे घेतले होते. मात्र जादा मजुरी मिळत असल्याने ऊसतोड मजूर हे दुसरीकडे कामाला गेल्याचे समजल्याने चौगूले व जाधव यांनी मजुरास आमचे एक लाख रुपये परत करा, असे भ्रमणध्वनीवरून सांगितल्यानंतर तुमचे पैसे दोन, तीन महिन्यांनी परत करतो असे ऊसतोड मजुराने सांगितले.

    पोलिसांत गुन्हा दाखल
    त्यानंतर १४ तारखेला वडरी, ता. यावल येथील शेतकरी तेजपाल चौधरी यांच्या शेतातून ऊस तोडून किसन पवार यांच्या मुलगा शिवशंकर किसन पवार हा ट्रॅक्टरने ऊस घेऊन मुक्ताईनगरला साखर कारखान्यावर जात असताना तालुक्यातील बोहर्डी गावा जवळून ९३७३ २०९ १९६ या भ्रमणध्वनीवरून रात्री दहा वाजेच्या सुमारास किसन पवार यांना तुमचा मुलगा शिवशंकर यास दोन चार व्यक्तीने मारहाण करून गाडीत बसवून नेल्याचे कळवले. तेव्हा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बोहर्डी येथे जाऊन मुलाचा व ट्रॅक्टरचा शोध घेतला असता फक्त ट्रॅक्टर रोडवर उभे होते तर मुलगा त्या ठिकाणी नसल्याचे समजल्याने माझ्या मुलास रघुनाथ चौगुले, अशोक चौगुले व त्यांचे दोन तीन जोडीदाराच्या मदतीने अपहरण केल्याची शंका त्यांना आली. त्यानंतर ऊसतोड कामगार किसन पावार यांच्या फिर्यादीनुसार रघुनाथ चौगूले, अशोक चौगूले व त्यांच्या जोडीदाराविरोधात अपहरणाचा गुन्हा नाेेंदवण्यात आला आहे.