कायदा करा नाहीतर पायउतार व्हा; लोकायुक्त कायद्यावरून आक्रमक झालेल्या आण्णांचा ठाकरे सरकारला इशारा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकायुक्ताच्या मुद्यावर आक्रमक झाले असून त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीकाही केली(Anna warns Thackeray government against Lokayukta law).

    नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकायुक्ताच्या मुद्यावर आक्रमक झाले असून त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. लोकायुक्त कायदा बनविण्याचं लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होतं. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीकाही केली(Anna warns Thackeray government against Lokayukta law).

    जादू कोणी केली?

    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यावर बोलायलासुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. काय घडले? कोणी जादू केली? ठाकरे कसे बोलायचे बंद झाले? या विषयी मला माहिती नाही मात्र निश्चित काही तरी घडले आहे असे अण्णा म्हणाले.

    जनआंदोलनाची गरज

    मुख्यमंत्री या मुद्यावर बोलायला तयार नाहीत. नेमके काय झाले हे कळायला मार्ग नाही, असे हजारे म्हणाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. राज्यातील 35 जिल्ह्यात आमची कमिटी तयार झाली असल्याची माहिती हजारे यांनी दिली.

    केजरीवालांवर नाराजी

    आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची दोन राज्यात सत्ता आली. पण त्या राज्यात लोकायुक्त कायदा तयार करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटत असल्याचे हजारे म्हणाले.