चाैघांवर ॲट्राॅसिटीचा गुन्हा : वणी येथे विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार व नंतर  लूट

पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सकाळी लवकर घटनास्थळाची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या. फाॅरेनि्सक पथकांना पाचारण केले. घटनास्थळावरुन परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले. या संशयितांची वैद्यकीय तपासणी केली असता दोन संशयित दारूच्या नशेत असल्याचे आढळले उर्वरित संशयितांच्या वैद्यकीय  तपासणीत आवश्यक ते पुरावे पोलीसांना मिळाले.

  प्रविण दोशी , वणी : येथील विवाहित महिलेवर बुधवारी रात्री संगनमत करुन सामूिहक अत्याचार करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने महिलेच्या भ्रमणध्वनीची लूट केल्याप्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  बसस्थानकाजवळील घटना
  याबाबत अधिक माहिती  अशी की, रात्रीच्यावेळी वणीच्या दत्तनगर येथील पीडित महिला मेडीकल स्टाेअर्समधून औषधे घेऊन घराकडे परतत असताना बसस्थानक परिसरात आली व तेथे परिचित असलेल्या कडाळे यांच्याशी बोलत असताना हे संशयीत या ठिकाणी होते. त्यांनी या महिलेला दमदाटी करत बसस्थानकापासून १०० मीटर अंतरावर नेले व तेथे दोघांनी अत्याचार केला. तद‌्नंतर देवनदीलगत बसस्थानकापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर निर्जनस्थळी नेले व उर्वरित दोन संशयितांनी तिच्यावर अत्याचार केला.
  संशयित ताब्यात
  या घटनेची माहिती महिलेचा परिचित साक्षीदाराने वणी पोलीस ठाण्यात येऊन सांगितली. त्यादरम्यान पीडित महिला व तिचा मुलगा पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आपबिती कथन केली. त्यानंतर सपोनी स्वप्नील राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसराची पाहणी केली. तेव्हा या ठिकाणी  दुचाकी आढळून आली. ही दुचाकी संशयितांचीच असल्याची माहीती मिळाली पोलीस दबा धरुन बसले व संशयित दुचाकी घेण्यासाठी आला असता पोलीसांनी त्यास पकडले व पाेिलसी खाक्या दाखविला. तेव्हा चौघांनी सामूिहक अत्याचार केल्याची कबुली दिली. पोलीसांनी परिसर िपंजून संशयितांना अटक केली.
  डीएनए तपासणार
  उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड रात्रीपासून तळ ठाेकून होते. दरम्यान, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सकाळी लवकर घटनास्थळाची पाहणी केली व योग्य त्या सूचना दिल्या. फाॅरेनि्सक पथकांना पाचारण केले. घटनास्थळावरुन परिस्थितीजन्य पुरावे संकलित केले. या संशयितांची वैद्यकीय तपासणी केली असता दोन संशयित दारूच्या नशेत असल्याचे आढळले उर्वरित संशयितांच्या वैद्यकीय  तपासणीत आवश्यक ते पुरावे पोलीसांना मिळाले. संशयितांचे डीएनए सॅम्पल मुंबई येथील कलिना प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची मािहती आहे.
  भ्रमणध्वनी जप्त
  दरम्यान, वणी परिसरात असामािजक अपप्रवृत्ती फोफावली असून, त्या उन्मादातून हा प्रकार चर्चा आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लूट केलेला भ्रमणध्वनी पाेिलसांनी जप्त केला असून, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड व सपोनी स्वप्नील राजपूत आधिक तपास करत आहेत.