If a baby is born during the Corona period this country will gives bonus to couples

२७ मार्च २०२१ ला नाशिक शहरात सर्वाधिक दोन हजार १८१ नवे बाधित आढळून आले. महिनाभरात सुमारे ३० हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोना आजाराचा ट्रेंड तपासताना आरोग्य विभागाला लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

    नाशिक : गेल्या वर्षीच्या कोरोना लाटेत लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्याने बालकांना कोरोना संसर्गाचा फारसा धोका नव्हता असे सांगण्यात आलेले मात्र, दुसऱ्या लाट बालकांसाठी घटक असल्याचे उघड झालं आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांमध्ये २० टक्के लहान मुले असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोंदविले आहे.

    आजारी किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोरोनाची भीती अधिक असल्याचे सांगितले जात असले, तरी कोरोनाची काळजी न घेतल्याने तरुणांमध्ये कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अधिक असल्याची बाब सप्टेंबर महिन्यातील एका अहवालातून स्पष्ट झाली होती. मे ते जून महिन्यात ६० पेक्षा अधिक वयोगटात कोरोनाबाधितांचे प्रमाण अधिक होते.

    दर दहा रुग्णांमागे दोन ते तीन मुले

    २७ मार्च २०२१ ला नाशिक शहरात सर्वाधिक दोन हजार १८१ नवे बाधित आढळून आले. महिनाभरात सुमारे ३० हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोना आजाराचा ट्रेंड तपासताना आरोग्य विभागाला लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. दर दहा रुग्णांमागे दोन ते तीन मुले कोरोना संसर्गित आढळून येत आहेत. लहान मुलांना होणाऱ्या कोरोना संसर्गात हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.