अबब ! उमराणे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाखांची बोली

देवळा : नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या लिलावाची बोली लावण्यात आली. हा सरपंच पदाचा लिलाव चक्क २ कोटी ५ लाखात पोहचला असल्याचा व्हिडिओ सद्या समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.

देवळा : नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे ग्रामपंचायत सरपंचपदासाठी झालेल्या लिलावाची बोली लावण्यात आली. हा सरपंच पदाचा लिलाव चक्क २ कोटी ५ लाखात पोहचला असल्याचा व्हिडिओ सद्या समाज माध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.

काेटींची उड्डाणे
राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूकीची धूम सुरु आहे. अनेक ग्रामपचायतीमध्ये सरपंच पदासाठी लिलाव लावला जात आहे. नंदुरबार खोडामळी गावच्या सरपंच पदाच्या लिलावाची घटना ताजी असताना. नाशिकच्या उमराणा येथे सरपंच पदासाठी लिलावात कोटी कोटीचे उड्डाणे घेतल्याचे समोर आले.

मंदिर अावारात बाेली
जिल्ह्यातील प्रमुख कांदा बाजार समिती व मुंबई- आग्रा महामार्गामुळे नावारुपाला आलेल्या उमराणे गावात ग्रामपंचायत निवडणुकीची मोठी चुरस असते. यंदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार रितसर गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री रामेश्वर महाराज मंदिर आवारात लिलावात बोली लावण्यात आली. १ कोटी ११ लाखांपासून सुरु झालेल्या लिलाव हा २ कोटी ५ लाखावर पोहचला.

सर्वत्र चर्चेचा विषय
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकल्याचे समजते.लिलावाचा हा पैसा रामेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे. उमराणा गावाच्या कोटी कोटी रूपयांच्या लिलावाची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा आहे.

व्हीिडअाेत ताेडमाेड : देवरे
उमराणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाचा लिलाव वगैरे झाल्याच्या चर्चा या बिनबुडाच्या व निराधार असून,आजपावेतो सरपंच आरक्षण सुद्धा जाहीर झालेले नाही.त्या बाबतचा व्हायरल झालेला व्हिडिओही तोडमोड केलेला आहे. मुळात जी काही चर्चा व्हिडिओत दिसते आहे ती उमराण्याचे ग्रामदैवत आणि गावाची अस्मिता असलेल्या रामेश्वर मंदिराच्या ७ वर्षांपासून रखडलेल्या कामाबाबत आहे.

‘त्या’ बातम्या निव्वळ अफवा
एकवेळ निवडणूक बिनविरोध घ्या आणि या मंदीराच्या बांधकामासाठी निधी उभा करू या, अशी तमाम ग्रामस्थांची भावना होती. रामेश्वराचे जुने मंदिर पाडून त्याच्या जीर्णाेद्धाराचे काम २०१३ पासून लोकवर्गणीतून सुरू आहे. परंतु निधी अपुरा पडल्याने हे काम बंद झाले. मंदिर होणे, हे गावाच्या आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यासाठी आम्ही गटतट बाजूला ठेवून मार्ग काढत आहोत. त्यामुळे सरपंच पदाचा लिलाव वगैरे अशा काही समाजमाध्यमावर पसरलेल्या बातम्या या निव्वळ अफवा आहेत. आमचे गाव अतीशय सुसंस्कृत, सुशिक्षित व लोकशाहीवादी असून कदापि अशा थराला जाणार नाही, याची खात्री बाळगावी, असे उमराणे येथील प्रशांत देवरे यांनी स्पष्ट केले.