गांधीनगर प्रेस कामगार युनियनची द्विवार्षिक निवडणूक

गांधीनगर प्रेस कामगार युनियनची द्विवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली . अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली . या निवडणुकीमध्ये युनियनच्या जनरल सेक्रेटरी पदी रवी आवारकर हे सलग दुसऱ्यांदा भरघोस मतांनी विजयी झाले

    नाशिक : गांधीनगर प्रेस कामगार युनियनची द्विवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली . अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली . या निवडणुकीमध्ये युनियनच्या जनरल सेक्रेटरी पदी रवी आवारकर हे सलग दुसऱ्यांदा भरघोस मतांनी विजयी झाले असून,विभाग प्रतिनिधी म्हणून राम हारक,गणेश रोकडे,भगवान दवंगे,के एस व्यंकटेश,समद शेख,राजेंद्र चौधरी आणि बाळू भांगरे हे विजयी झाले आहे . विजयी उमेदवारांचे विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यानी स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे .

    निवडणुकीत सत्तारूढ पँनलच्या सर्वांच्या सर्व उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली . विरोधी गटातील एकाही उमेदवाराला विजयी होण्यात यश मिळाले नाही . निवडणूक यशस्वी करण्यासाठी पॅनलचे नेते संजय डोंगरे,भरत भोगले,सुनील पवार,प्रशांत भराडे,देवेंद्र पगारे,सुनील उन्हवणे आदींनी परिश्रम घेतले . यावेळी प्रेस अधिकारी आणि सर्व कामगारांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.