मुकणे धरणात बुडून दोघांचा मृत्यू

जिंदाल पोलिफिल्म कंपनित काम करत असलेले काही परप्रांतीय युवक होळी सण साजरा करत असताना दुपारी मुकणे धरणावर अंघोळी साठी आले होते अंघोळ करीत असताना त्यातील तीन तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले असता बाकीच्या तरुणांनी आरडा ओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावले, तसेच काही नागरिकांनी वाडीव-हे पोलिसांना फोनवरुन माहिती दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ धाव घेतली.

    इगतपुरी : तालुक्यातील मुकणे धरणावर आज दुपारी काही युवक फिरण्यासाठी गेले असता अंघोळ करण्याचा मोह त्यांना अवरता आला नाही,अंघोळ करताना तिघे युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले त्यातील एका युवकाला वाचविन्यात स्थानिक नागरिक व पोलिसांना यश आले तर दोन जणांचा बुडून मृत्यु झाला.

    जिंदाल पोलिफिल्म कंपनित काम करत असलेले काही परप्रांतीय युवक होळी सण साजरा करत असताना दुपारी मुकणे धरणावर अंघोळी साठी आले होते अंघोळ करीत असताना त्यातील तीन तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले असता बाकीच्या तरुणांनी आरडा ओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीला धावले, तसेच काही नागरिकांनी वाडीव-हे पोलिसांना फोनवरुन माहिती दिली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने एका रविन्द्र भरत सिंग या तरुणाला वाचविन्यात यश आले,तर मनोज कुमार मोहनचंद्र जोशी वय-५१ रा.गौजिली,उत्तराखंड,आणि कामलसिंग खरकसिंग बिष्ट रा.नैनीताल ,उत्तराखंड हे दोन तरुण मात्र मयत झाले. वाचलेल्या तरुणाला जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

    धुलिवंदनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने जिंदाल कंपनी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत होती. अधिक तपास वाडीव-हेचे पोलिस निरिक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली,सपोनि शिंदे, पोऊनि पाटील,हवालदार देवीदास फड हे करीत आहेत.