जीवघेणं भांडण – प्रेयसीवर तब्बल ३० वार करुन प्रियकराने केली निर्घृण हत्या, नाशिकमध्ये उडाली खळबळ

प्रियकराने आरपीआयची पदाधिकारी असलेल्या प्रेयसीवर तब्बल ३० वार करुन निर्घृण हत्या(Boyfriend Killed His Girlfriend) केल्याची घटना गुरुवारी दिवाळीच्या दिवशीच घडली आहे.लिव्ह इन रिलेशनमध्ये(Live In RelationShip) राहणाऱ्या दोघांत आर्थिक वाद झाल्याने ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले असून नाशिकमध्ये(Nashik Crime) खळबळ उडाली आहे.

    नाशिक: दोन खुनांच्या(Murder) गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगून बाहेर आलेल्या प्रियकराने आरपीआयची पदाधिकारी असलेल्या प्रेयसीवर तब्बल ३० वार करुन निर्घृण हत्या(Boyfriend Killed His Girlfriend) केल्याची घटना गुरुवारी दिवाळीच्या दिवशीच गंगापूर रोडवरील संत कबीर नगर झोपडपट्टीत घडली आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या दोघांत आर्थिक वाद झाल्याने ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले असून नाशिकमध्ये(Nashik Crime) खळबळ उडाली आहे.

    पूजा आंबेकर (वय ३२, रा. संत कबीर नगर झोपडपट्टी, नाशिक) असे आरपीआयच्या मृत महिला पदाधिकाऱ्याचे नाव असून संतोष आंबेकर (वय ३७, रा. संत कबीर नगर)असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे.

    गेल्या काही दिवसांपूर्वीच संतोष आंबेकर हा दोन खुनांच्या गुन्ह्यात शिक्षा भागून जेलमधून बाहेर आला होता. तसेच १०, १२ दिवसांपासून पूजा हिच्यासह झोपडपट्टीतील एका पत्र्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होता. दोघांमध्ये आर्थिक वादातून भांडणे होत होती. अशातच गुरुवारी सकाळी दोघांत पैश्यांच्या वादातून भांडण झाले. तेव्हा संतप्त आंबेकर याने धारदार चाकू काढून पूज्या हिच्या गालावर, पोटावर आणि मानेवर तब्बल ३० ते ३५ वार केले. वर्मी घाव लागल्याने व अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी संताेष आंबेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शाेध घेतला जात आहे.