वीर टाक घेऊन होळी भोवती फेरा धरून नाचविण्याची परंपरा खंडित

धुलिवंदन च्या दिवशी घरोघरी देव्हाऱ्यात असलेले पूर्वजांचे वीर टाक हाती घेऊन होळी भोवती फेरा धरून नाचविण्याची परंपरा आहे. यातही या टाकांना रामकुंडावर पवित्र तीर्थस्थान घालून घरी जाऊन तळी भंडारा भरण्याची प्रथा रूढ आहे. सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने सार्वजनिक उत्सव व कार्यक्रमांवर बंदी घातली असून, रामकुंड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२९) धुलिवंदन असल्याने सायंकाळी अनेक नागरिक परंपरेनुसार वीर घेऊन येत होते.

    पंचवटी : होळी सण साजरा झाल्यानंतर धुलिवंदन च्या दिवशी घरोघरी असलेल्या देव्हाऱ्यातील वीरांचे टाक मिरवण्याची परंपरा आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने, याठिकाणी सायंकाळी नागरिकांना येण्यास सक्त मनाई करण्यात येत होती. पंचवटी पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग पोलीस बंदोबस्त व बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते.

    धुलिवंदन च्या दिवशी घरोघरी देव्हाऱ्यात असलेले पूर्वजांचे वीर टाक हाती घेऊन होळी भोवती फेरा धरून नाचविण्याची परंपरा आहे. यातही या टाकांना रामकुंडावर पवित्र तीर्थस्थान घालून घरी जाऊन तळी भंडारा भरण्याची प्रथा रूढ आहे. सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने सार्वजनिक उत्सव व कार्यक्रमांवर बंदी घातली असून, रामकुंड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२९) धुलिवंदन असल्याने सायंकाळी अनेक नागरिक परंपरेनुसार वीर घेऊन येत होते. परंतु पोलीस बंदोबस्त चोख असल्याने त्यांना बंदी घालत होते.

    तरीही काही नागरिक पोलिसांना चकवा देत रामकुंड, सीता कुंड व हनुमान कुंड पर्यंत पोहचत होते. होळकर पुलाजवळील एकमुखी दत्त मंदिर समोर तसेच खंडोबा कुंड, रोकडोबा पटांगण लगत नदी पात्रात वीर टाकांना स्नान घालून माघारी फिरत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर दुसरीकडे पोलिसांनी सरदार चौक, मालेगाव स्टँड, इंद्रकुंड, खांदवे सभागृह आदी ठिकाणी बॅरिकेड्स लावून पायी नागरिकांसह वाहतुकीस मार्ग बंद केला होता. यावेळी सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत हे स्वतः बंदोबस्तात सामील होऊन परिस्थिती हाताळत असल्याचे पाहायला मिळाले.