मनमाड रेल्वे स्थानकावर तरुणाचा निर्घृणपणे खून ; प्रेम प्रकरणातून हत्त्या झाल्याची प्राथमिक माहिती

रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर तीक्ष्ण हत्याराने 5 ते 6 वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो प्रयन्त त्याचा मृत्यू झाला होता.हत्त्या केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले आहे.

    मनमाड : चार ते पांच जणांच्या टोळीने तरुणाची निर्घृणपणे हत्त्या केल्याची खळबळजनक घटना काल (शनिवार) मध्यरात्री मनमाड रेल्वे स्थानकावर घडली असून .शिवम पवार(रा.उसवड ता.चांदवड) असे हत्त्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर तीक्ष्ण हत्याराने 5 ते 6 वार केले. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तो प्रयन्त त्याचा मृत्यू झाला होता.हत्त्या केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले आहे.प्रेम प्रकरणातून ही हत्त्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून हत्त्या करण्यात आली तेंव्हा मुलगी देखील त्या ठिकाणी होती तीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करत आहे त्यानंतर खुनाचे कारण काय याचा उलगडा होईल.

    शिवमला 3 बहिणी असून भाऊबाजीच्या दिवशी भावाचा खून झाल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले .या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी भदवी 302/34 प्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी कल्याण,उल्हासनगर भागात पथक पाठविण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जोगदंड करीत आहेत.