भोंदूबाबांना कायद्याचा धाक राहिला नाही – चित्रा वाघ

आशा भोंदूबाबाना आळा बसला पाहिजे. सर्वत्र असे भोंदूबाबा चेकाळले असून ज्या कोणी अशा भोंदूबाबा पासून पीडित असेल त्यांनी पुढे यावे त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहव चित्रा वाघ यांनी केले.

    नाशिक : येवला तालुक्यातील नागडे येथील भोंदूबाबा व त्याच्या भावाचा आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार व धर्म परिवर्तन साठी बळजबरी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी येवल्यात घडली होती. या संदर्भात चौकशीसाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ येवला येथे पीडितेच्या घरी जाऊन भेट घेतली.

    येवला मध्ये एका भोंदूबाबाने व त्याच्या भावाने आईसह 3 मुलींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. शिवाय या प्रकरणात धमकी देऊन कुटुबियांकडून पैसेही उकळण्यात आले. त्यामुळे पीडितेने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. या बलात्काराच्या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी शहर पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांची भेट घेतली आणि तपासकार्याबाबत माहिती घेतली.

    आशा भोंदूबाबाना आळा बसला पाहिजे. सर्वत्र असे भोंदूबाबा चेकाळले असून ज्या कोणी अशा भोंदूबाबा पासून पीडित असेल त्यांनी पुढे यावे त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहव चित्रा वाघ यांनी केले. तरी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून अशाप्रकारे भोंदू बाबांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला असून भोंदूबाबांना कायद्याचा धाक राहिला नसल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.