परिवहनमंत्री अनिल परब यांना दिलासा ; भ्रष्टाचाराच्या आराेपात तथ्य नसल्याचा पोलीस आयुक्तांचा निष्कर्ष

परिवहन विभागात मोटार वाहन निरिक्षक म्हणून कार्यरत असणारे गजेंद्र तानाजी पाटील यांनी परिवहन विभगातील कथित भ्रष्टाचाराबाबत १५ मे रोजी पंचवटी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. तर पोलीस दखल घेत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यात परिवहन विभागातील भ्रष्टाचार तसेच पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नमूद केले होते.

    नाशिक : परिवहन विभागातील माेटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आराेपांची पूर्ण झाली असून, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असा कुठलाही गुन्हा घडला नसल्याचा निष्कर्ष पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काढला आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांना सादर करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

    परिवहन विभागात मोटार वाहन निरिक्षक म्हणून कार्यरत असणारे गजेंद्र तानाजी पाटील यांनी परिवहन विभगातील कथित भ्रष्टाचाराबाबत १५ मे रोजी पंचवटी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. तर पोलीस दखल घेत नसल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यात परिवहन विभागातील भ्रष्टाचार तसेच पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नमूद केले होते.

    या प्रकरणात ३५ जणांची चाैकशी, कागदपत्रांची तपासणी करण्यात आ ली. हि प्रक्रिया सुमारे २५ दिवस सुरू हाेती. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पाटील यांनी केलेल्या आराेपांमध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांचेही नाव गाेवण्यात आल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले हाेते. पाटील यांनी तक्रारीत नमूद केलेल्या भ्रष्टाचार, अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, अनागोंदी कारभार, वादग्रस्त कार्यपद्धती या सर्वच मुद्यांवर सखाेल चाैकशी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे. चाैकशीअंती यापैकी कोणताही गुन्हा नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी याप्रकरणी पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. २७ मे पासून सुरू झालेल्या चौकशीस दोन वेळा पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती.