येवल्यात दूषित पाणीपुरवठा : सुधारणा न झाल्यास आंदाेलन ; राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवला शहरातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर नळांना अत्यंत गढूळ व दूषित पाणी येत आहे, याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत अाहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, पोटाचे विकार यांसारख्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे

    येवला : शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्यात त्वरित सुधारणा करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येवला नगरपालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

    यांची उपस्थिती
    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, निसार शेख, मुश्रीफ शहा, सुभाष गांगुर्डे, नितीन जाधव, निसार लिंबुवाले, अविनाश कुक्कर, सचिन सोनवणे, योगेश सोनवणे, योगेश तक्ते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

    आराेग्यावर परिणाम
    नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येवला शहरातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर नळांना अत्यंत गढूळ व दूषित पाणी येत आहे, याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत अाहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, डायरिया, पोटाचे विकार यांसारख्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या गंभीर बाबीकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून, पालिकेने याकडे त्वरित लक्ष घालून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. प्रशासक व मुख्याधिकारी डॉ. संगीता नांदुरकर यांना पालिकेच्या प्रवेशद्वारावरच निवेदन देण्यात आले.